सहसा पैंजण हे चांदीचे असतात कारण शरीरातील उष्णता कमी करण्यास ते मदत करतात. पैंजण म्हटले की एकपदरी पैंजण अगदी सहजपणे आढळतात. पण छोट्या छोट्या घुंगरांच्या अनेक सरी एकत्र गुंफून फुलांचा गजरा गुंफावा तसे ‘गजरी पैंजण’ गुंफले जातात. त्याला वर असलेली पट्टीही नक्षीदार आणि ठाशीव असते. त्यामुळे नववारी नेसल्यावर तर ‘गजरी पैंजण’ त्या पेहरावाला एक वेगळीच श्रीमंती देतात. माप ओलांडताना नववधूच्या शुभशकुनी पावलांना रूणझुण पैंजणांची साथ हवीच.
Specifications
- 92.5% Pue Silver with Antique polish